in

कंगनाविरोधातील तपास अहवाल सादर करा; न्यायालयाचा पोलिसांना आदेश

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईच्या मॅजिस्ट्रेट कोर्टानं कंगना रणौतप्रकरणी तपास अहवाल सादर करण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. सोशल मीडियावर भडकाऊ पोस्ट लिहिल्याचा आरोप कंगनावर आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात एका वकिलाच्या तक्रारीवरून कोर्टानं कंगनाचा तपास करण्याचा आणि ५ डिसेंबरपर्यंत अहवाल सादर करण्याचा आदेश पोलिसांना दिला होता.

वकील आसिफ खान देशमुख यांनी कंगनाविरोधात तक्रार दाखल केली आहे. अनेकवेळा मुदत वाढवूनही पोलीस तक्रार नोंदविण्यात अपयशी ठरले आहेत. मी कोर्टाला आरोपीविरोधात थेट कारवाई करण्यास सांगितले होते. कंगनाविरोधात प्राथमिक प्रकरण दाखल आहे की नाही, हे सांगावे असे आदेश दिले आहेत.

कंगना रणौतने एका व्हिडिओमध्ये विशिष्ट समुदायाला दहशतवादी म्हटले आहे. याबाबत तक्रार देत करत आसिफ खान देशमुख यांनी कारवाईची मागणी केली होती.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Live update : देशभरात चक्काजाम आंदोलनाला सुरुवात

“अदानी शरद पवारांच्या घरी येऊन गेले, अन्…वीजबिल माफीचा निर्णय बदलला”