कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावमुळे 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाइन होणार की ऑफलाइन, असा प्रश्न निर्माण झाला होता. यामुळे विद्यार्थी संभ्रमावस्थेत होते. कोरोनाने पुन्हा एकदा डोकंवर काढलं असून दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत भर पडत आहे. यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे, यात विद्यार्थांच्या यंदाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा ऑनलाइन घ्याव्यात की ऑफलाइन, हा प्रश्न प्रशासनासमोर होता. मात्र आता या परीक्षा ऑफलाइन होणार, असा निर्णय घेण्यात आला आहे.
यंदा 25 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, त्यामुळे इतक्या 25 लाख विद्यार्थांची परीक्षा ऑनलाइन घेणं प्रशासनाला शक्य होणार नाही, त्यामुळे शिक्षण विभागाने ऑफलाइन परीक्षा घेण्यास अनुकूलता दाखवली. आधी देखील इतर वर्गाच्या ऑनलाइन परीक्षा घेण्यात आल्या होत्या, मात्र तांत्रिक अडचणीमुळे परीक्षा नीट झाल्या नाहीत आणि यामुळे विद्यार्थांनाही अनेक अडचणींना समोर जावं लागलं होतं
ऑनलाइन परीक्षा का शक्य नाही?
10वी आणि 12वीच्या परीक्षेत शहरी आणि ग्रामीण भागातील 25 लाख विद्यार्थी परीक्षा देणार आहे. यात ग्रामीण भागातून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थींची संख्या जास्त आहे. शहरी भागात नेट कनेक्टिव्हिटीचा जास्त फटका विद्यार्थांना बसत नाही, मात्र ग्रामीण भागात नेटवर्क व्यवस्थित नसल्याने विद्यार्थांना अनेक अडचणींना सामोर जावं लागतं. यात विद्यार्थांचंही नुकसान होतं आणि याचं पार्श्नभूमीवर परीक्षा ऑफलाइन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना नियमाचं पालन करुन सुरक्षा लक्षात घेऊन विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल, असं देखील त्यांच्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
कधी होणार परीक्षा?
महाराष्ट्र राज्य मंडळाने दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर केलं. दहावीची परीक्षा 29 एप्रिल ते 20 मे दरम्यान होईल. बारावीची बोर्डाची परीक्षा 23 एप्रिल ते 20 मे दरम्यान होणार आहे.
Comments
Loading…