in

उपमुख्यमंत्र्यांच्या बारामतीत मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला हरताळ

रुपेश होले : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्याला संबोधित करताना कोरोनाचे नियम पाळण्यास सांगितलं आहे. अन्यथा लाॅकडाऊनचाही इशारा दिला आहे. मात्र उपमुख्यमंत्र्यांच्या मतदार संघ असणाऱ्या बारामतीत हेच कोरोनाचे नियमांनाच व्हेंटिलेटरवर ठेवल्याचं पाहायला मिळलं आहे.

बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखाना निवडणुकीची धामधूम जोरात सुरू आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. यामुळे उपविभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे यांच्या प्रशासकीय भवनातील कार्यालयात झुंबड पहायला मिळाली आहे. कोरोनाचे कोणतेही नियम येथे पाळण्यात आल्याचं दिसलं नाही. यामुळे उपमुख्यमंत्र्यांच्या गावातच ही परिस्थिती असेल तर इतर ठिकाणंच काय असा प्रश्न उपस्थित होतो.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

प्रसिद्ध दिग्दर्शकाविरोधात अभिनेत्री शर्मिष्ठा राऊतचे खळबळजनक आरोप

ठाण्यात ‘Lokशाही’च्या रिपोर्टरला धक्काबुक्की करणाऱ्याला अटक