संदीप गायकवाड | वसई-विरार शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत चालला आहे. आज तब्बल 807 नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. या वाढत्या प्रादुर्भावामुळे आजपासून कडक अंमलबजावणीला सुरवात झाली आहे. वसई विरार महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष देहेरेकर यांनी नवीन आदेश काढत कडक नियमावली जाहीर केली आहे. या नियमावली आता काय सुरू राहणार आणि काय बंद राहणार हे पाहूयात…
नविन नियमावली
- वसई विरार महापालिका हद्दीत आजपासून 144 कलम लागू.
- शहरात दिवसा संचारबंदी तर रात्री नाईट कर्फ्यु सुरू.
- सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 8 पर्यंत 5 पेक्षा अधिक व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी एकत्र जमणार नाहीत किंवा फिरणार नाहीत.
- सोमवार ते गुरुवार या दिवशी रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत आणि शुक्रवारी रात्री 8 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत कुणालाही बाहेर फिरता येणार नाही.
- अत्यावश्यक सेवा वगळता शहरातील बाजारपेठा बंद.
- आठवड्याचे सर्व दिवस रात्री 8 ते सकाळी 7 पर्यंत आणि शुक्रवार रात्री 8 ते सोमवार सकाळी 7 पर्यंत परिसरातील समुद्र किनारे, उद्याने, सार्वजनिक मैदान पूर्णपणे बंद राहतील.
- सार्वजनिक वाहतुकीत आटो रिक्षात चालक पकडून 2 प्रवाशी प्रवास करतील, टॅक्सी मध्ये 50 टक्के आसन क्षमता, बसमध्ये उभे राहून प्रवास बंद, प्रवासा दरम्यान मास्क सक्तीचा असणार आहे. दरम्यान नियमांचे उल्लंघन झाल्यास 500 रुपये दंड ठोठावणार.
- चित्रपटगृह, नाट्यगृह, प्रेक्षकगृह,अमयुझमेंट पार्क, अरकेड, व्हिडीओ गेम, पार्लर, वॉटर पार्क, क्लब, जलतरण तलाव, व्यायामशाळा, क्रीडासंकुल, पूर्णपणे बंद राहतील.
- शहरातील सर्व धार्मिक स्थळ भाविकांसाठी बंद, पण पूजा अर्चा करणाऱ्या सेवेकरीसाठी चालू राहतील.
- केशकर्तनालाय शॉप, स्पा, सलून, ब्युटीपार्लर पूर्णपणे बंद.
- उत्पादन क्षेत्र अटी व शर्थीच्या अधीन राहून चालू राहतील.
Comments
Loading…