कल्याण-डोंबिवलीमध्ये गेल्या 5 महिन्यानंतर पहिल्यांदाचं 300च्या पार नविन कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे दिवसागणिक कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता 11 मार्च, अर्थात उद्यापासून कल्याण-डोंबिवलीमध्ये कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.
कल्याण-डोंबिवलीमध्ये 24 तासांमध्ये 392 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. 5 महिन्यांनंतर सापडलेली सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. त्यामुळे पालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी तातडीने पोलीस यंत्रणा आणि आरोग्य प्रशासनाची बैठक बोलावून शहरात कठोर निर्बंध लागू करण्याबाबत निर्देश दिले आहेत.
काय आहेत निर्बध?
- अत्यावश्यक सेवांची दुकाने वगळता इतर दुकानं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 अशी सुरु असतील.
- शनिवार आणि रविवारी पी-1 आणि पी-2 या व्यवस्थेनुसार दुकानं सुरू ठेवली जातील.
- बार आणि हॉटेल्ससाठी रात्री 11 ऐवजी 9 वाजेपर्यंतचीच वेळ ठरवण्यात आली आहे. तर होम डिलिव्हरीसाठी रात्री 10 वाजेपर्यंत मुभा असेल.
- भाजीमंडई 50 टक्के क्षमतेनंच चालवल्या जातील.
- लग्न आणि हळदी समारंभात 50 नातेवाईकांच्या संख्येचं उल्लंघन करू नये. या समारंभांसाठी देखील सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंतची वेळ ठरवण्यात आली आहे.अशा कार्यक्रमांत उल्लंघन झालं, तर वधू-वराच्या माता-पित्यांविरोधात आणि मंगल कार्यालयांविरोधात गुन्हे दाखल केले जातील.
- महाशिवरात्रीसाठी कल्याण-डोंबिवलीमध्ये असलेले 62 मंदिरं फक्त पूजा करण्यासाठी उघडलं जाईल, दर्शनासाठी मंदिरं बंद असतील.
- होम आयसोलेशनमध्ये असलेले करोना बाधित फिरताना आढळले, तर त्यांच्याविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल.
Comments
Loading…