कोरोनाच्या वाढत्या संख्येमुळे राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी लॉकडाऊन लावण्यात आला आहे. या संदर्भात पंढरपूरात कारवाई करत पोलीसांनी नाकाबंदी केली असून २५७ मठांची तपासणी केलीय. माघ यात्रेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली आहे. तर तालुक्यात 28 ठिकाणी तर शहरात 8 ठिकाणी नाकाबंदी केल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक विक्रम कदम यांनी दिली.
माघी यात्रेपुर्वीच वारकऱ्यांनी पंढरपुरातील मठामध्ये मुक्काम केला होता. मात्र कोरोनाच्या वाढत्या संख्येला लक्षात घेवून पोलीस प्रशासाने मठात वारकऱ्यांना मुक्काम करु दिल्यास मठाधिपतींवर गुन्हा दाखल करणार असल्याची नोटीस मठात दिल्या आहेत. पोलीसांनी मठांची तपासणी करताच ३५ ते ४० हजार भाविक आपल्या गावी यात्रेपुर्वीच परतले आहेत. यामुळे माघी यात्रेपुर्वीच पंढरपूर रिकामे होताना दिसत आहे.
पोलिसांनी शहरातील १३७ मठ तर ग्रामीण भागातील १२० मठांची तपासणी केली आहे. या तपासणी दरम्यान शनिवारी मठामध्ये भाविकांची संख्या होती. मात्र रविवारी मठांची तपासणी केल्यानंतर मठातील उतरलेल्या भाविकांची संख्या कमी झाली असल्याचे दिसून आले आहे.
पंढरपुर हद्दीवर कडक नाकाबंदी करण्यात आलीय. पंढरपूरात येणाऱ्या वाहनधारकांचे नाव , मोबाईल नंबर घेऊनच पुढे सोडले जात आहे. तसेच मास्कची देखील तपासणी केली जातेय. भाविकांनी शहरात प्रवेश करू नये, मुक्काम करू नये यासाठी आवाहन केले जात आहे.
Comments
Loading…