in

”माय-भगिनींच्या रक्षणासाठी सरकारला बळ दे”; यशोमती ठाकूरांचे महालक्ष्मीला साकडे

सूरज दहाट | राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री व अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांच्या अमरावती येथील निवासस्थानी गौरी महालक्ष्मीची स्थापना करण्यात आली आहे. यानिमित्त ‘राज्यातील माय-भगिनींच्या रक्षणासाठी सरकारला बळ दे’, असे साकडे गौरी महालक्ष्मीची पूजा करून यशोमती ठाकूर यांनी मागितले.

“आदिमाया, आदिशक्ती, महालक्ष्मी राज्यातील प्रत्येक माणसाच्या घरात धनधान्य, सुखसौख्य, समृद्धी नांदू दे यंदा पाऊस काळ चांगला झालाय अशीच तुझी कृपा राहू दे  अतिवृष्टीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांना लढण्याचं बळ दे…बळीराजाला जसं पावसाचं दान दिलं, तसंच राज्यातील कोविडची महामारी लवकरात लवकर दूर कर केंद्रातल्या अन्याय सरकारने वाढलेली महागाई आणि बेरोजगारी लवकरात लवकर कमी कर. मुख्य म्हणजे या राज्यातील माय भगिनींच्या पोषणासाठी, सशक्तीकरणासाठी, सक्षमीकरणासाठी झुंजण्याचे बळ दे. महिलांवरील अत्याचार थांबू दे,  सगळ्यांना सुबुद्धी दे माय, माय भगिनींच्या रक्षणासाठी सरकारचे हात अधिक मजबूत कर ग माय”. अशा शब्दात महालक्ष्मी मातेकडे राज्याच्या हितासाठी मंत्री यशोमती ठाकूर यांनी साकडे घालून प्रार्थना केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘माझा गणोबा’ हे अनोखं गाणे गणेशभक्तांच्या भेटीस

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट; भारतरत्न पं. भीमसेन जोशी यांना स्वरवंदना देणारा कार्यक्रम