भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पुण्यामध्ये भाजपा जातीयवादी असल्याचा आरोप खोडून काढण्याच्या प्रयत्नात एक वादग्रस्त विधान केले. त्यावरून ते सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत.
चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते भारतीय जनता युवा मोर्चाच्या ‘युवा वॉरियर्स’ अभियानाचा शुभारंभ पुण्यात झाला. भाजपा कसा मुस्लीमविरोधी नाही हे सांगण्याबरोबरच पंतप्रधान नरेद्र मोदी यांची प्रशंसा करताना ते वाहवतच गेले. ते म्हणाले, मुस्लीम आक्रमकांची देशात जुल्मी राजवट होती. त्यांनी आमची मंदिरे पाडली. आमच्या महिला भ्रष्ट केल्या. पण सर्व मुस्लीम तसे नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यात मुसलमान होतेच. जे चांगले आहेत, त्यांना आपले म्हटले पाहिजेच ना! देशविरोधी कारवाया करणाऱ्या मुस्लिमांना आमचा विरोध आहे. पण सर्व मुस्लिमांना विरोध नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अब्दुल कलाम यांना राष्ट्रपती केले. मुस्लीम होते म्हणून त्यांना बाजूला ठेवले नाही. एक संशोधक म्हणून त्यांना मान दिला, असा अजब दावा त्यांनी केला.
‘मोदी भक्तां’प्रमाणेच पंतप्रधानांची प्रशंसा करता करता भाजपा नेत्यांचा तोल सुटतो. यापूर्वी भाजपाचे प्रदेश प्रवक्ते अवधूत वाघ यांनी नरेंद्र मोदी हे विष्णूचे अकरावे अवतार असल्याचे सांगून अतिशयोक्तीची परिसीमाच गाठली होतीी.
Comments
Loading…