in ,

कोरोनाबाधित रुग्णाचा उपचार थांबवला; खासगी रुग्णालयांची मनमानी

नाशिकमध्ये बिल न भरल्याने कोरोना रुग्णावर उपचार थांबवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने नाशिक मधल्या खासगी रुग्णालयांचा मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. दरम्यान या कारभारामुळे रुग्णांचे नातेवाईक वैतागले असून या रुग्णांवर कारवाईची मागणी जोर धरते आहे.

नाशिक शहरात कोरोना रुग्ण वाढत असून बेड्स उपलब्ध नसल्याची ओरड असताना आता पुन्हा एकदा खाजगी रुग्णालयांची मनमानी वाढल्याचा प्रकार समोर आला आहे. कोरोना बाधित रुग्णाने उपचारासाठी पैसे भरले नाही म्हणून त्याच्यावर सद्यस्थितीत सुरू असलेले उपचार थांबवण्याचा प्रकार वोकहार्ट हॉस्पिटलमध्ये घडला आहे. अनामत रक्कम पोटी बिल भरलं नाही म्हणून एका रुग्णावर तीन दिवसांपासून कोरोना रुगणाची ट्रीटमेंट बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नातवाईकांकडून खाजगी रूग्णालयाविरोधात संताप व्यक्त होत आहे.

दरम्यान नाशिकमध्ये खाजगी रुग्णालयांचा मनमानी कारभार वाढतच चालला आहे. त्यामुळे आता अशोका हॉस्पिटल पाठोपाठ वोकहार्ट हॉस्पिटलवरही कडक कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरते आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Lockdown | मुख्यमंत्र्यांची सर्वपक्षीयांसोबत उद्या पुन्हा बैठक, संचारबंदीची शक्यात बळावली

लस उपलब्ध करावी – सोनू सूद