in

Rahul Gandhi | कोरोना लसींची निर्यात लगेच थांबवा – राहुल गांधींचं मोदींना पत्र

संपूर्ण देशामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 1,31,968 नवे रुग्ण आढळून आले आहेत. कोरोनामुळे आतापर्यंत देशभरात तब्बल 1,67,642 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात कोरोना लसीकरण वेगाने सुरू आहे. तर दुसरीकडे कोरोना लसींचा साठा नसल्याने अनेक ठिकाणी लसीकरण बंद करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. याच दरम्यान काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिलं आहे.

राहुल गांधी यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. “वाढत्या कोरोना संकटात लसींची कमतरता एक अतिगंभीर समस्या आहे, ‘उत्सव’ नाही. आपल्या देशवासियांना संकटात टाकून लसींची निर्यात योग्य आहे का? केंद्र सरकारने पक्षपातीपणा न करता सर्व राज्यांना मदत करावी. आपल्या सर्वांना मिळून या महामारीला हरवायचं आहे” असं ट्विट करत राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

कोरोना लसीकरणावरून त्यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “प्रत्येक भारतीयाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे” असं म्हणत त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे. “गरज आणि मागणी यावर वाद घालणं हास्यास्पद आहे. प्रत्येक भारतीय नागरिकाला सुरक्षित जीवन जगण्याचा हक्क आहे” असं राहुल गांधी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

वर्धात सागवान बागेला आग

Maharashtra Lockdown: राज्य तुमच्या मालकीचे नाही… राणेंचा हल्लाबोल