in ,

‘राज्यांनी चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली’- पंतप्रधान नरेंद्र मोदी

Share

नवी दिल्ली: राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत कोरोना विषयावर ही चौथी व्हिडीओ कॉन्फरन्स होती. प्रत्येक कॉन्फरन्समध्ये काही राज्यांना बोलण्याची संधी मिळाली. जी राज्ये राहिली होती त्यांच्या मुख्यमंत्र्यांना कोरोनाविषयक त्यांच्या राज्यात काय काय उपाययोजना सुरु आहेत ते सांगण्याची संधी आज मिळाली. महाराष्ट्राने यापूर्वीच्या तीन कॉन्फरन्समध्ये आपल्या उपाययोजनांची माहिती दिली होती.

कोरोना साथीला सुरुवात झाली आणि चीन वगळता इतर जे २० देश यामध्ये भारताबरोबर होते, आज ७ ते ८ आठवड्यानी भारताच्या तुलनेत या देशांमध्ये १०० पट जास्त लोकसंख्या संक्रमित झाली आहे. आणि कितीतरी मोठ्या संख्येने लोक मृत्यूमुखी पडले आहेत. योग्य वेळी लॉकडाऊनचा निर्णय आपण घेतला. राज्यांनी पण याची चांगली अंमलबजावणी केली, जनतेने देखील साथ दिली त्यामुळे त्याचा परिणाम आपल्याकडे काय झाला ते आपण पाहतोय. असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसमवेत सांगितले.

अजुनही भारतावरचे संकट टळलेले नाही. पहिला २१ दिवसांचा लॉकडाऊन आणि नंतरचा दुसऱ्या टप्प्यातील काही प्रमाणात शिथिल केलेला लॉकडाऊन या दोन्ही अनुभवांच्या आधारे आपल्याला जायचे आहे. आपल्या देशात अनेक लोक, विद्यार्थी, यात्रेकरू ठिकठिकाणी अडकले आहेत, त्यांना आणावयाचे आहे. विदेशातून अनेक भारतीयांना आणायचे आहे, त्यांना लगेच चाचण्या करून क्वारांटाइन करायचे आहे असेही सांगण्यात आले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात प्लाझ्मा थेरपी सुरु, अँटीबॉडीजसाठी ४ रुग्णांची चाचणी

कोरोना दीर्घ काळासाठी राहणार आहे, “ दो गज दूरी” हा जीवनाचा मंत्र बनवा – पंतप्रधान नरेंद्र मोदी