in

तरुणांनी एसटीच पळवून नेली ; प्रशासन हादरलं

लोकशाही न्यूज नेटवर्क

लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद शहाजानी बस स्थानकात गावाकडे जाण्यासाठी रात्री उशिरा एसटी बस नव्हती म्हणून बस स्थानकातून एसटीच पळवून नेण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं दारूच्या नशेत शेळगी गावातल्या तरुणांनी एसटीच पळवून नेली. एसटी पळवताना लाईटच्या दोन खांबांना देखील जोराची धडक बसल्यानं विजेच्या तारा तुटून खाली पडल्या. शिवाय विजेचा खांब देखील कोसळला आहे. पहाटेच्या सुमारास बस स्थानकात झोपलेल्या बसच्या चालक आणि वाहकाला एसटी जाग्यावर नसल्याचं समजताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले.

एसटी कर्मचाऱ्यांच्या तक्रारीनुसार औराद पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी बस सापडली. तरुणांनी एसटी बस पळवून नेताना झालेल्या अपघातामुळे एसटीचं २५ हजारांचं नुकसान झालं आहे. मात्र एसटी खात्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार पोलीस ठाण्यात नसल्यानं गुन्हाच नोंद झालेला नाही.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आंतरराष्ट्रीय स्तरावरून आलेल्या पाठिंब्यांशी टिकैत यांना काहीही देणे-घेणे नाही!

निवडणुका रद्द झालेल्या राज्यातील चार ग्रामपंचायतींसाठी 12 मार्चला मतदान