in ,

अखेर दहावीच्या विद्यार्थ्यांच्या निकालाचा मार्ग मोकळा…

Share

मुंबई: कोरोनाचा (COVID-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या देहशव्यापी लॉकडाऊनमुळे (Lockdown) महाराष्ट राज्य व उच्च माध्यमिक शिक्षण (Maharashtra Board SSC Result 2020) मंडळाचा दहावीचा भूगोलाचा ( SSC Geography Exam Marks) पेपर रद्ध (Cancelled Geography exam) करण्यात आला होता. त्यावर राज्य शिक्षण मंडळाने आता महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. 23 मार्चला दहावीच्या भूगोल विषयाचा पेपर होता.

दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 भूगोल व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने एक पत्रक काढले आहे. या विषयांच्या परिक्षेसाठी गुणदान करून निकाल जाहीर केले जाणार असल्याचे, राज्यमंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले आहे. सामाजिक शास्त्रे पेपर-२ भूगोल या विषयाचे गुणदान हे उमेदवाराने दिलेल्या अन्य विषयांच्या लेखी परीक्षेस पात्र केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेणार आहेत. तसेच त्याचे रुपांतर परीक्षा रद्द केलेल्या भूगोल विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कार्यशिक्षण या विषयाचे गुणदान त्याने अन्य विषयांच्या लेखी, तोंडी प्रात्यक्षिक/अंतर्गत मूल्यमापन/तत्सम परीक्षेत प्राप्त केलेल्या गुणांची सरासरी विचारात घेणार आहेत. त्याचे रूपांतर परीक्षा रद्द केलेल्या कार्यशिक्षण विषयाच्या परीक्षेसाठी निर्धारित केलेल्या गुणांमध्ये करण्यात येणार आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Golmaal 5: रोहित शेट्टी आणि अजय देवगन या जोडीचा गोलमाल 5 लवकरच भेटीला येणार?

अभिनेता मनमीत ग्रेवाल नंतर ‘या’ अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या