in

SSC Results Declared 2020; यंदाही दहावीच्या निकालात मुलींचीच बाजी

Share

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा ऑनलाईन निकाल अखेर लागला आहे. राज्याचा एकूण निकाल 95.30 टक्के लागला आहे. तसेच यंदाच्या निकालात सुद्धा मुलींनीच बाजी मारली आहे.

यंदा दहावीच्या बोर्डाचा निकाल हा 95.30 टक्के लागला आहे. दहावीच्या निकालात यंदा कोकणाने बाजी मारली आहे. तर औरंगाबादचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. 96.91 टक्के विद्यार्थिनी या उत्तीर्ण झाल्या आहेत तर 93.90 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.01 टक्क्यांनी जास्त आहे.

राज्यात यंदा दहावीच्या परीक्षेसाठी 17 लाख 65 हजार 898 विद्यार्थी बसले होते. यामध्ये 9 लाख 75 हजार 894 विद्यार्थी, तर 7 लाख 89 हजार 898 विद्यार्थिनी आहेत. दहावीची परीक्षा ही 3 मार्च 2020 ते 23 मार्च 2020 दरम्यान घेण्यात आली होती.

अंतर्गत मूल्यमापन, कृतीपत्रिका आणि भूगोलाचे सरासरी गुण यामुळे यावर्षीचा निकाल हा जास्त लागला असल्याचे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अध्यक्ष शकुंतला काळे पत्रकार परिषदेत सांगितले.

विभाग

  • पुणे : 97.34
  • औरंगाबाद : 92
  • नागपूर : 93.84
  • नाशिक : 93.73
  • मुंबई : 96.62
  • कोल्हापूर : 97.64
  • लातूर : 93.9
  • अमरावती : 95.14
  • कोकण : 98.77
  • नागपूर : 93.84

संकेतस्थळ
http://www.mahresult.nic.in/
http://www.sscresult.mkcl.org/
http://www.maharashtraeducation.com/
http://www.mahresult.nic.in/

अधिकृत वेबसाइटवर निकाल कसा पाहाल…
1) mahresult.nic.in या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
2) तिथे असलेल्या “SSC Examination Result 2020” या ऑप्शनवर क्लिक करा.
3) तिथे तुम्हाला विचारलेली माहिती सबमिट करा.
4) तुम्हाला तुमच्या नावे असलेला रिसल्ट समोर दिसेल.
5) आलेल्या माहितीमध्ये तुमचं नाव आणि तुमचा सिट नंबर तपासून पाहा.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

International Tiger Day 2020; जाणून घ्या ‘वाघ’ बद्दल काही खास गोष्टी

Rafale India Live Updates : संपुर्ण अंबालामध्ये कलम 144 केलं लागू