in

IND vs SL 3rd T20 । टी २० मालिका खिशात; ७ विकेट राखत श्रीलंकेचा विजय

भारतानं दिलेले ८२ धावांचं माफक आवाहन श्रीलंकेने पूर्ण करत विजय मिळवला. या विजयासह श्रीलंकेने टी २० मालिका खिशात घातली.

प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कर्णधार शिखर धवन बाद झाल्यानंतर काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा वरच्या आणि मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. अखेर २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. भारताकडून कुलदीप यादव याने नाबाद 23 धावा केल्या. तर श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दासुन शनाका याने दोन तर दुश्मंथा चमिरा, रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतला.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या कोल्हापूर दौऱ्यावर; पूरस्थितीची पाहणी करणार

उस्मानाबादमध्ये टेस्टींग वाढविण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना