in

क्रीडा कोट्यातून मिळणाऱ्या सरकारी नोकरीच्या यादीत २१ नव्या खेळांचा समावेश

लोकशाही न्यूज नेटवर्क
क्रीडा मंत्रालय भारत सरकारद्वारे क्रीडा क्षेत्रात खेळणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरीत स्थान दिले जाते. याच पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या विविध विभागांमध्ये तसेच मंत्रालयांमध्ये ‘क’गटातील कोणत्याही पदावर नेमणुकीसाठी, क्रीडा क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या व्यक्ती पात्र ठरण्यासाठी ग्राह्य धरण्यात येणाऱ्या क्रीडा प्रकारांच्या यादीत आता २१ नव्या खेळांचा समावेश करण्यात आला आहे. क्रीडामंत्री किरण रिजीजू यांनी या संबंधी राज्यसभेत माहिती दिली आहे. या खेळांमध्ये मल्लखांब सारख्या रांगड्या खेळांचा देखील समावेश करण्यात आला आहे.

या क्रीडा प्रकारात पुढील २१ खेळांचा समावेश करण्यात आला आहे.

 • १ बेसबॉल
 • २ बॉडी बिल्डिंग
 • ३ सायकल पोलो
 • ४ डेअफ स्पोर्ट्स
 • ५ फेन्सिंग
 • ६ कुडो
 • ७ मल्लखांब
 • ८ मोटार स्पोर्ट्स
 • ९ नेट बॉल
 • १० पॅरा स्पोर्ट्स (for sports discipline included in para-Olympics and Para Asian Games)
 • ११ पेनॅक सिलेट
 • १२ शूटिंग बॉल
 • १३ रोल बॉल
 • १४ रग्बी
 • १५ सेपाक टाक्राव
 • १६ सॉफ्ट टेनिस
 • १७ टेनपिन बॉलिंग
 • १८ ट्रायथलॉन
 • १९ रस्सीखेच
 • २० वुशु
 • २१ टेनिस बॉल क्रिकेट

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

क्रिकेटच्या थेट हवाई छायाचित्रणासाठी सशर्त ड्रोनला परवानगी

अकोलासाठी 185 कोटींच्या निधीवरून बच्चू कडूंची नाराजी