in ,

कोरोना व्हायरस: स्पाईस जेटमधील कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण

Share

नवी दिल्ली: स्पाईस जेटमधील एका इंजिनिअरला कोरोनाची लागण झाल्याने स्पाईस जेटमध्ये खळबळ उडाली आहे. याआधी देखील स्पाईस जेटमध्ये एक जण कोरोना पॉझिटीव्ह सापडला असुन मंगळवारी दुसरी केस सापडल्याने स्पाईस जेटमध्ये खळबळ उडालीय. स्पाईस जेटकडुन याबाबत अधिक सांगण्यात आले आहे की, सदर कोरोनाबाधित इंजिनिअर शेवटचा २२ एप्रिल रोजी दिल्लीच्या इंदिरा गांधी विमानतळावर काम करत होता. त्यानंतर सोमवारी त्याची तपासणी केली असता तो पॉझिटीव्ह सापडलाय.

खबरदारीचा उपाय म्हणून, त्याच्याशी थेट संपर्क साधलेल्या सर्व कर्मचा-यांना आणि कर्मचार्‍यांना पुढील दोन आठवड्यांसाठी घरी क्वारंटाइन करण्यात आले आहे. एअरलाइन्सच्या म्हणण्यानुसार, त्याला योग्य ती वैद्यकीय सेवा देण्यासाठी सर्व उपाययोजना केल्या जात आहेत. “आम्ही सरकार व डब्ल्यूएचओने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन केले आहे,” असे त्यात म्हटले आहे. जानेवारी अखेरपासून सर्व विमानांचे निर्जंतुकीकरण सुरु केले होते आणि आता वापरात असलेले जंतुनाशक डब्ल्यूएचओच्या माहितीनुसार वापर करत आहेत.

देशातील कोरोनाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे चित्र आहे. देशातील कोरोना रुग्णांची संख्या ३१ हजार ३३२ वर पोहचली आहे. एकूण मृतांचा आकडा १००७ वर पोहचला असून, तर आत्तापर्यंत ७ हजार ६९५ रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली. देशातील कोरोना रुग्णांचं बरे होण्याचं प्रमाण २३ टक्क्यांवर आहे. तर गेल्या २४ तासात ७३ जणांचा मृत्यू झाला असून १८९७ रुग्णांची भर पडलीय.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

लॉकडाऊनमुळे महापालिका निवडणूका स्थगित, औरंगाबाद आणि नवी मुंबई महापालिकेवर प्रशासक

प्रख्यात बॉलिवूड अभिनेता इरफान खान याचं निधन