in

Special Trains| आजपासून ते 30 नोव्हेंबरपर्यंत धावणार 392 विशेष ट्रेन्स

Share

सणासुदीच्या पार्श्वभूमीवर या काळात प्रवाशांची गावाकडे जाण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेता भारतीय रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला असून त्यानुसार आजपासून ४० दिवसांसाठी ३९२ विशेष ट्रेन्स धावणार आहेत. सणासुदींच्या दिवसांसाठी या ३९२ विशेष ट्रेनची काही दिवसांअगोदरच रेल्वेकडून घोषणा करण्यात आली होती. शिवाय, फेस्टिव्ह स्पेशल ट्रेन असे या ट्रेनना नाव देखील देण्यात आले आहे. या ट्रेन्स २० ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत धावणार आहेत.

यासंदर्भात रेल्वकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, कमीत कमी ताशी ५५ किलोमीटर वेगाने या ट्रेन धावणार आहेत. विशेष म्हणजे या रेल्वेचे भाडे देखील इतर स्पेशल ट्रेनप्रमाणेच असणार आहे. या सर्व ट्रेनमध्ये जास्तीजास्त एसी 3 टायर कोच असणार आहे. गेल्या काही दिवसांपासून सणासुदीसाठी रेल्वे विशेष ट्रेन चालवणार असल्याच्या बातम्या येत होत्या, पण एकूण किती विशेष ट्रेन असतील हे निश्चित झाले नव्हते. या दरम्यान, सणासुदीसाठी रेल्वेकडून २०० पेक्षा अधिक विशेष ट्रेन चालवल्या जातील.

तसेच, गरज पडल्यास या विशेष ट्रेन्सची संख्या वाढवल्या देखील जाऊ शकते, असे रेल्वे बोर्डाचे अध्यक्षांनी म्हटले होते. त्यानुसार ३९२ विेशेष ट्रेन्स आता चालवल्या जाणार आहेत. या विशेष ट्रेन्सची यादी देखील रेल्वेकडून जाहीर करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रवाशांसाठी नियमावली देखील रेल्वेकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Online Shopping App |7 दिवसांत अ‍ॅप मराठी भाषेत सुरू करा, अन्यथा त्यांची दिवाळी मनसे स्टाईलने होईल

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार, काय बोलणार याकडे लक्ष