in

बॉक्स ऑफिसवर सूर्यवंशीचा धमाका; ‘बंटी और बबली 2’ ची निराशा

चित्रपटगृह सुरू झाल्यानंतर सर्वांनी सिनेमा थिएटर्सकडे धाव घेतली . अभिनेता अक्षय कुमारचा (Akshay Kumar) ‘ चित्रपट सूर्यवंशी'(sooryavanshi) हा चित्रपट 5 नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला. या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळत आहे. त्याच बरोबर सैफ अली खान, राणी मुखर्जी, सिद्धांत चतुर्वेदी आणि शरवरी वाघ अशी भन्नाट स्टार कास्ट असणारा ‘बंटी और बबली-2 (Bunty Aur Babli 2) देखील प्रदर्शित झाला.

सुर्यवंशी आणि बंटी और बबली-2 या चित्रपटांची बॉक्स ऑफिसवर टक्कर झाली. ‘सूर्यवंशी’ने ‘बंटी और बबली-2’ चित्रपटापेक्षा जास्त कमाई करत बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

ट्रेड अनॅलिस्ट तरण आदर्श यांच्या मते, ‘बंटी और बबली 2’ चित्रपटाने वीकेंडला जवळपास 9 कोटी रूपयांची कमाई केली तर ‘सूर्यवंशी’ने प्रदर्शित झाल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 120 कोटी कमवले. ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट इंटरनॅशनल लेवल वर 1300 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तसेच भारतात हा चित्रपट चार हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला. तसेच ‘बंटी और बबली’ हा चित्रपट भारतात 1800 स्क्रीन्सवर आणि परदेशात 700 स्क्रीन्सवर प्रदर्शित झाला.

‘सूर्यवंशी’ ने वर्ल्डवाइड 280 कोटी रूपयांची कमाई केली. तसेच जॉन अब्राहमचा ‘सत्यमेव जयते 2’ आणि सलमान खानचा ‘अंतिम : द फायनल ट्रुथ’ हे दोन चित्रपट देखील प्रदर्शित झाले. हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Gold-Silver Rate Today: आठवड्याच्या शेवटी सोन्या-चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या दर

मी अमित शाहांकडे तक्रार करणार – नवाब मलिक