in

प्रसिद्ध गायक सोनू निगम गोल्फ पटू क्रिशिव टेकचंदानी यांनी कोरोना लसीकरण मोहीमेचे केले आयोजन

मुंबई- कोरोना संक्रमण आटोक्यात आणण्यासाठी देशभरात मोठ्या प्रमाणावर कोविड लसीकरण मोहीम राबवली जात आहे. या पार्श्वभूमीवर आज गायक सोनू निगम, गोल्फपटू क्रिशिव टेकचंदानी आणि मनीष सिधवानी यांनी पुढाकार घेत चेंबूरमधील बसंत पार्क येथे कोविड लसीकरण मोहिमेचे आयोजन केले होते.

या मोहिमेत पात्र नागरिकांचे मोफत लसीकरण करण्यात आले. या आधी सोनू निगम आणि क्रिशिव यांनी मुंबईमध्ये विविध ठिकाणी ऑक्सिजन कॉन्सट्रेंटरचे वाटप केले होते. त्यानंतर आज त्यांनी या लसीकरण मोहिमेसाठी पुढाकार घेतला. यावेळी भाजप खासदार मनोज कोटक आणि पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी या लसीकरण मोहिमेसाठी प्रमुख उपस्थिती लावली होती.

“आज संपूर्ण जग कोरोनाच्या विळख्यात अडकलेले आहे. समाजातील प्रत्येक घटकाकडून जमेल तशी मदत गरजू लोकांना केली जात आहे. कलाकार म्हणून भारतीयांनी नेहमीच मला भरभरून प्रेम दिले आहे. आणि या पुढेही देतील म्हणून मी संकटाच्या काळात माझ्याकडून छोटी मदत करण्याचा प्रयत्न करत आहे”, अशी भावना सोनू निगम यांनी यावेळी व्यक्त केली.

“कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता लसीकरण मोहिमेला गती देणे आवश्यक आहे”, अशी प्रतिक्रिया खासदार मनोज कोटक यांनी दिली. तसेच “आज कोरोनाशी दोन हात करण्यासाठी लसीकरण महत्त्वाचे आहे. या दृष्टीने मोठ्या संख्येने अशा लसीकरण मोहीम राबवण्याची आवश्यकता आहे”, असे मत पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या अंकिता पाटील यांनी व्यक्त केले.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”भाजपाचा मराठा आरक्षण विरोध”

OBC Reservation | “ओबीसींच्या आरक्षणावर घाला…हे भाजपाचं पाप”