in ,

“सरकारचे असे काही धंदे चालतात …”; ठाकरे सरकारवर राज्यपालांची टीका

लोकशाही न्यूज नेटवर्क

आंतरराष्ट्रीय धावपटू कविता राऊतला नोकरी न देण्यासंदर्भात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्य सरकारवर टीका केली आहे. नाशिकमध्ये आदिवासी सांस्कृतिक भवन इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याच्या कार्यक्रमामध्ये राज्यपाल बोलत होते. यावेळी या कार्यक्रमाला कविता राऊत देखील उपस्थित होत्या.

कार्यक्रमाच्या वेळी बोलताना राज्यपाल म्हणाले की, कविता राऊतला आपल्या गावात राहायचं असून सेवा करायची आहे. क्रीडामंत्री सुनील केदार यांनी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण अजून मिळालेली नाही. मंत्र्याने सांगूनही नोकरी मिळत नसेल तर काहीतरी गडबड आहे. पण मी कविताला सांगू इच्छितो की, थोडा वेळ लागेल पण नोकरी नक्की मिळेल. कारण सरकार येथे असे काही धंदे चालतात, काहीतरी अडचण आणत राहतात,” अशी टीका करत राज्यपालांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

यासोबतच राज्यपाल म्हणाले की, ते मुख्यमंत्री असताना शिक्षकांसाठी केलेल्या कामाची माहिती देताना राज्य सरकारशी चर्चा करु असं आश्वासन दिलं आहे.


What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

फेब्रुवारीत ‘या’ वेबसिरीज प्रदर्शित होणार

इंटरनेट हा शेतकऱ्यांचा मूलभूत अधिकार; अमेरिकेने दिला सर्वोच्च न्यायालयाचा दाखला