in

कंकणाकृती सूर्यग्रहणाला भारतीय मुकणार

काही दिवसांपूर्वी भारतीयांनी आकाशात चंद्रग्रहण पाहण्याचा आनंद घेतला. 10 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण दिसणार आहे. परंतु ते भारतीयांना पाहता येणार नाही. नासाने दिलेल्या माहितीनुसार हे ग्रहण केवळ कॅनडा, ग्रीनलँड आणि रशियाच्या काही भागांतून दिसेल. परंतु आकाशातील या सुंदर दृश्याला भारतीयांना मुकावे लागणार आहे.

10 जून रोजी कंकणाकृती सूर्यग्रहण सर्वप्रथम कॅनडा, उत्तर ओंटारियो आणि सुपिरियर लेकच्या उत्तरेकडील भागातून दिसेल. केवळ तीन मिनिट कंकणाकृती सूर्यग्रहण तेथील नागरिकांना पाहता येईल. हे सूर्यग्रहण दुपारी 1.42 दिसण्यास सुरूवात होईल आणि संध्याकाळी 6.41 हे ग्रहण संपेल. यानंतर 4 डिसेंबरला सूर्यग्रहण होणार आहे. परंतु हे ग्रहण देखील भारतीयांना पाहता येणार नाही.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

परमबीर सिंह यांच्या विरोधात तक्रार करणाऱ्या मयुरेश राऊतवर गुन्हा दाखल

BCCI T-20 | बीसीसीआयला टिट्वेन्टी-२० विश्वचषकाच्या निर्णयासाठी मुदतवाढ