in ,

… म्हणून गोव्यातील 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलल्या

Share

मडगाव: गोव्यात येत्या ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन कोरोना व्हायरसच्या प्रादुर्भावामुळे होणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. सध्या गोव्यात वाढलेले कोरोनाचे रूग्ण, महामारीचे संकट, राज्याची आर्थिक परिस्थिती, रखडलेले साधनसामुग्रींचे काम आणि ठराविक वेळेत क्रीडा किट्स मिळविण्यात आलेल्या अपयशामुळे 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेचे आयोजन होणे कठीण असल्याचे इंडीयन ऑलिंपीक असोसिएशन अध्यक्ष नरिंदर बात्रा यांनी सांगितलंय.

राज्य शासनाने यापूर्वीच इंडियन ऑलिम्पिक संघटनेला (आयओए) एक पत्र पाठवून तशी कल्पनाही दिल्याचे समजले होते. गोव्यात या स्पर्धेचे आयोजन 20 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर 2020 या कालावधीत होणार होते. वास्तविक आयओएने गोव्याला या स्पर्धेचे आयोजन 2008 मध्ये बहाल केले होते. त्यानंतर कित्येक वेळा गोव्याने विविध कारणे देऊन स्पर्धा पुढे ढकलण्यातही यश मिळविले.

आता तर कोरोनाचे एक भक्कम कारण पुढे आले असून आयओएसुद्धा नाही म्हणू शकणार नसल्याचे हे कारण असल्यामुळे ही स्पर्धा येत्या ऑक्टोबर महिन्यात कोणत्याही स्थितीत होणार नाही हे ठरलेले आहे. जून ते सप्टेंबर महिन्यात गोव्यात पावसाचा मोसम असतो. साधनसुविधांच्या कामात पावसाचा अडथळा असतोच. यामुळे आता राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा पुढे ढकलण्याची केवळ औपचारिक घोषणाच बाकी होती ती हि झालीये.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राज्यात उष्मघाताने पोल्ट्री व्यवसाय पुन्हा अडचणीत

VIDEO | भुकेलेल्या पोटासाठी त्याने भाकरीची चोरी केली