पुणे शहरात वाढत्या रुग्णांमुळे कोरोना पुन्हा डोक वर काढताना दिसतोय आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासन कडक निर्बंध लावण्याच्या तयारीत आहे. पुणेकरांनी सर्व नियमांचे पालन केलं नाही तर भविष्यात आणखी कडक निर्बंध लादले जाऊ शकतात असा इशारा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिला आहे. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
गेल्या काही दिवसांपासून पुण्यात कोरोना रुग्णांची आकडेवारी वाढत चालली आहे. त्यामुळे आजपासून शिवाजीनगरमधील सीईओपो महाविद्यालयाच्या मैदानावरील जम्बो कोविड सेंटर आजपासून सुरू करण्यात आले आहे. सध्या या सेंटरमधील ५५ बेड सुरु करण्यात आले आहेत अशी माहिती मुरलीधर मोहोळ यांनी दिली. मात्र पुणेकरांनी सर्व नियमांचे पालन करावे असं आवाहनही महापौरांनी केलं आहे.
दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी आजपासून कोविड सेंटर सुरू करीत असून आठवड्याभरात ५०० बेड सेवेसाठी असणार आहेत,” अशी माहिती दिली. या सेंटरमधील ५०० पैकी २५० ऑक्सिजन बेड, २०० सीसी बेड आणि ५० आयसीयू बेड असणार आहेत.
Comments
Loading…