लोकशाही न्यूज नेटवर्क
गेल्या 15 दिवसांपासून मुंबईच्या आझाद मैदानात राज्यातील सर्व जिल्ह्यांमधील हजारो शिक्षक आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. विना अनुदानित शाळांमधील हे शिक्षक गेल्या 15 दिवसांपासून आपल्या हक्कांसाठी आंदोलन करत आहेत. 15 दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाकडे सरकारने फारसे लक्ष न दिल्याने हे शिक्षक संतप्त झालेत. आणि त्यांना आत्मदहनाचा इशारा दिला आहे .
विनाअनुदानित शाळांमधील या शिक्षकांना गेली अनेक वर्ष पगार मिळत नाहीये. सरकारने विना अनुदानित, अंशत: अनुदानित शाळांसाठी २० टक्के अनुदान जाहीर केले होते. पण या निर्णयाची अंमलबजावणी झाली नसल्याने या शिक्षकांनी आंदोलन तीव्र केले आहे. संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलक शिक्षकांची संख्या जवळपास 60 हजार इतकी आहे. कित्येक शिक्षकांना आपला पगार गेल्या कित्येक वर्षांपासून मिळालेला नाही. त्यामुळे हे शिक्षक आता दुसरे काम किंवा व्यवसाय करत आहेत.
हक्काचे पैसे मिळत नसल्याने हे सगळे शिक्षक बेमुदत आंदोलनासाठी आझाद मैदानात बसले आहेत. काही दिवसांपूर्वी शिक्षण राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आंदोलक शिक्षकांची आझाद मैदानात येऊ भेट घेतली होती. तेव्हा ३ दिवसात शिक्षकांच्या मागण्या पूर्ण करण्यात येकतील असे आश्वासन त्यांनी आंदोलकांना दिले होते.
पण अजूनहीपर्यंत या शिक्षकांच्या मागण्या पूर्ण झालेल्या नाहीत. त्यामुळे आता आंदोलक शिक्षकांनी झाद मैदानात अर्धनग्न आंदोलन करून सरकार विरोधात आंददोलन तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन आम्ही करणार आहोत, असा इशाराही देण्यात आला आहे.
Comments
Loading…