दिवाळीनंतर राज्यातील कोरोना स्थिती बिकट होत चालली आहे. दररोज कोरोना रुग्णांचा आकडा नवीन उच्चांक गाठत आहे. आज राज्यात कोरोनाचे साडे सहा हजार रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे राज्याची चिंता पुन्हा वाढली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात 6 हजार 159 नवे कोरोना रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या 17 लाख 95 हजार 959 इतकी झाली आहे. तसेच मागील चोवीस तासांमध्ये 4 हजार 844 रुग्ण कोरोना मुक्त झाले आहेत. आत्तापर्यंत महाराष्ट्रात एकूण 16 लाख 63 हजार 723 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
आज नोंदवण्यात आलेल्या 65 मृत्यूंपैकी 56 मृत्यू हे मागील 48 तासांमधले आहेत. तर 9 मृत्यू हे मागील आठवड्यातले आहेत अशीही माहिती महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिली आहे.त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट हा 92.64 टक्के इतका झाला आहे.
Comments
0 comments