in

…तर गणेश नाईक यांची एसआयटी चौकशी करावी – सुप्रिया सुळे

इंटरनॅशनल डॉनबरोबर संबंध असल्याचं जाहीर वक्तव्य करणाऱ्या भाजपा आमदार गणेश नाईक यांची एसआटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या संदर्भात गृहमंत्री अमित शहा यांना पत्र लिहिणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

“इंटरनॅशनल डॉनसोबत संबंध अससल्याचं जाहीर वक्तव्य करणाऱ्या गणेश नाईक यांची एसआटी चौकशी करावी. हा देशाच्या सुरक्षेचा प्रश्न असून याबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी लक्ष घालावे.” यासाठी अमित शाह यांच्यासोबत लेखी पत्रव्यवहार करणार असून संसदेत याबाबत प्रश्न उपस्थित करणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले.

गणेश नाईक काय म्हणाले ?

नवी मुंबई महापालिका निवडणुकीच्या आधीच शिवसेना आणि राष्ट्रवादीने भाजपचे काही नगरसेवक फोडलेत. या फोडाफोडीवर भाष्य करताना गणेश नाईक म्हणाले,”कोणत्याही गुंडगिरीला घाबरु नका. रात्री अपरात्री मला कधीही फोन करा. इथलेच काय इंटरनॅशनल डॉन सुद्धा मला ओळखतात. त्यामुळे घाबरायची गरज नाही, असं गणेश नाईक यांनी तुर्भेतील पक्षाच्या भाषणात सांगितलं.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

”अमरावती, यवतमाळमध्ये परदेशी स्ट्रेन आढळला नाही”

Tech Update : मोटोरोलाचा स्वस्त फोन भारतात झाला लाँच