in ,

Vaishali Made : गायिका वैशाली माडे करणार राष्ट्रवादीत प्रवेश

लोकप्रिय गायिका वैशाली माडे आता लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (NCP) प्रवेश करणार आहेत. 31 मार्चला वैशाली मुंबईतील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीचा झेंडा हाती घेणार. वैशाली यांनी अनेक चित्रपटांत गाणी आणि मराठी मालिकांची ‘टायटल साँग’ देखील गायली आहेत.

मराठी बिग बॉसमुळे वैशाली माडे चर्चेत आल्या होत्या. त्यात त्यांनी स्पर्धक म्हणून सहभाग घेतला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा त्यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाची चर्चा रंगली आहे. राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत त्या पक्षप्रवेश करणार आहेत. गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

सचिन – युसूफनंतर आता ‘या’ क्रिकेटपटूला कोरोनाची लागण

सेक्स स्कँडल प्रकरण दाबण्याचा प्रयत्न; कर्नाटक काँग्रेसचा आरोप