in

गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक

Share

कोरोनाविरुद्ध लढा देणारे प्रसिद्ध गायक एस. पी. बालसुब्रमण्यम यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर आली आहे. MGM रुग्णालयाने या संदर्भात एक पत्रक काढून ही माहिती दिली आहे. तसेच सलमान खानने सुद्धा त्यांना लवकर बरे होण्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

५ ऑगस्ट रोजी एस. पी.बालसुब्रमण्यम यांना करोनाची बाधा झाली होती. त्यांनी एक व्हिडीओ पोस्ट करुन याबाबतची माहिती दिली होती. आता त्यांची प्रकृती अत्यंत नाजूक असल्याचं MGM रुग्णालयाने माहिती दिली आहे.\दरम्यान त्यांच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी अनेक दाक्षिणात्य कलाकारांनी त्यांची प्रकृती सुधारावी म्हणून प्रार्थना केली आहे.

तसेच बॉलीवूडचा खान सलमान खानने सुद्धा एस. पी.बालसुब्रमण्यम यांनी लवकरात लवकर बरे व्हावे या संदर्भातले ट्वीट केले आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Mumbai Local | मध्य रेल्वेने वाढवल्या 68 लोकल फेर्‍या

IPL 2020; चेन्नई सुपर किंग्ज आज दिल्ली कॅपिटल्सशी भिडणार