in

Sidharth Shukla| सिद्धार्थ शुक्लाची शेवटची पोस्ट फ्रंटलाईन योद्ध्यांसाठी!

चित्रपट विश्वातील लोकप्रिय अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Sidharth Shukla) याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. तो 40 वर्षांचा होता. मुंबईतील कपूर रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. सिद्धार्थ शुक्ला टीव्ही शो ‘बालिका वधू’मधील ‘शिव’ भूमिकेमुळे प्रसिद्ध झाला. कूपर हॉस्पिटलच्या एका अधिकाऱ्याने त्याच्या मृत्यूची पुष्टी केली आहे. सिद्धार्थ शुक्लाला सकाळी हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगितले जात आहे. सिद्धार्थ शुक्लाचा शवविच्छेदन अहवाल प्रतीक्षेत असून, त्याच्यासोबत राहणाऱ्या लोकांचे स्टेटमेंट घेण्यात येणार असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

सध्या मुंबई पोलिसांची टीम कपूर हॉस्पिटलमध्ये पोहोचली आहे. दिवंगत सिद्धार्थची बहीण आणि मेहुणाही रुग्णालयात पोहोचले आहेत. सिद्धार्थ शुक्लाचे शवविच्छेदन दुपारी साडे बारा वाजता केले जाईल, असे म्हटले जात आहे. या सगळ्या दरम्यान सिद्धार्थची शेवटची सोशल मीडिया पोस्ट सध्या चर्चेत आली आहे. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोश करताना कोव्हिड योद्ध्यांचे आभार मानले आहेत. सिद्धार्थची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे.

काय आहे सिद्धार्थच्या पोस्टमध्ये
साधारण एक आठवड्यापूर्वी सिद्धार्थने त्याच्या इंस्टाग्राम या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्याने आपल्या आगामी प्रोजेक्टचे प्रमोश करताना कोव्हिड योद्ध्यांचे आभार मानले होते. या पोस्टमध्ये तो म्हणाला, ‘सर्व फ्रंटलाईन योद्ध्यांना, मनापासून धन्यवाद! तुम्ही तुमचा जीव धोक्यात घालता, अगणित तास काम करता आणि जे रुग्ण त्यांच्या कुटुंबियांसोबत राहू शकत नाहीत त्यांची काळजी घेता. आपण खरोखर सर्वात धाडसी आहात! एखाद्या लढ्याच्या अग्रभागी असणे इतके सोपे नाही, परंतु आम्ही तुमच्या प्रयत्नांचे खरोखर कौतुक करतो. #MumbaiDairiesOnPrime ही या पांढऱ्या टोपीतील सुपरहिरोला, नर्सिंग स्टाफ आणि त्यांच्या असंख्य बलिदानासाठी एक मानवंदना आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

स्वामी प्रभुपाद जयंती निमित्त खास नाणे मोदींच्या हस्ते प्रदर्शित

Pune| आयपीएस अधिकाऱ्यासह चार जणांवर पोलिसात गुन्हा दाखल