लोकशाही न्यूज नेटवर्क
शहरांमध्ये अनेक प्रकारचे पोस्टर आपल्याला पाहायला मिळतात. राजकीय पक्षाचे, चौकात वाढदिवस आणि नेत्यांचे बॅनर लावलेले आपण अनेकदा पाहातो. मात्र, मागील काही वर्षांपासून प्रेमी युगुलंही चौकांमध्ये एकमेकांसाठी पोस्टर लावत असल्याचं चित्र अनेक ठिकाणी सर्रास पाहायला मिळत आहे.
फेब्रुवारीचा दुसरा आठवडा व्हॅलेंटाईन वीक म्हणून साजरा केला जातो. या पूर्ण आठवड्यात प्रेमी युगुलं आपलं प्रेम एकमेकांजवळ व्यक्त करत असतात. मात्र, गोमती नगरच्या परिसरात लागलेल्या या पोस्टरवर ‘सिद्धी हेट्स शिवा’ असं लिहिण्यात आलं आहे. व्हॅलेंटाईन वीकदरम्यान शहरात लागलेले हे पोस्टर चर्चेचा विषय ठरत आहेत. हा पोस्टर कोणी आणि का लावला आहे, हे अद्यापही समोर आलं नाही. मात्र कोणाला तरी प्रेमामध्ये धोका मिळाल्यानं हे पोस्टर लावले गेले असावे. जवळपास पाच ते सहा जागी असे मोठमोठे होर्डींग लावले गेले आहेत. असेच पोस्टर मुंबईच्या बेस्ट बसवरती सुद्धा असे पोस्टर पाहायला मिळत आहेत.
यापूर्वी पुण्यातील ‘shivade i am sorry’ नावाचे पोस्टर लावण्यात आले होते. या तरूणानं पुण्याच्या पिंपळे सौदागर परिसरात तब्बल 300 पोस्टर लावले होते. या पोस्टरची शहरात सगळीकडेच चर्चा रंगली होती. आता असाच आणखी एक प्रकार समोर आला आहे.
Comments
Loading…