in

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा

हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापणा पार पडली आहे. पुण्याचा राजा मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम मंडळाचे अध्यक्ष प्रवीण परदेशी यांच्या हस्ते झाली. यावेळी उत्सवप्रमुख पुनीत बालन, अध्यक्ष संजीव जावळे, उपाध्यक्ष बाळासाहेब निकम, सचिव दिलीप आडकर, सहसचिव मिलिंद सातव, खजिनदार सुरज रेणुसे व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे उत्सवप्रमुख पुनीत बालन आहेत. यंदा या ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सवाचे दुसरे वर्ष आहे. या महोत्सवाचा आज पहिलाच दिवस असून राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्त आफळे यांचे “देशवीरांचे चरित्र” या विषयावरील कीर्तनाचे सादरीकरण होणार आहे. हा ऑनलाइन सांस्कृतिक महोत्सव लोकशाही न्यूजवर Lokshahi News आणि श्रीमंत भाऊसाहेब रंगारी ट्रस्टच्या www.bhaurangari.com संकेतस्थळावर रात्री ८ वाजता पाहता येणार आहे. त्यामुळे या ऑनलाइन महोत्सवाचा गणेशभक्तांनी मनसोक्त आनंद घ्यावा, असे आवाहन लोकशाही न्यूज यानिमित्त करत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा

भारताबाहेरील गणपतीची रूपे