in

हजारो भाविकांच्या उपस्थित श्री विठ्ठल बिरदेव यात्रा पडली पार

कोल्हापूरात लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री विठ्ठल बिरदेव पट्टण कोडोली यात्रेचा आज मुख्य दिवस आहे. दरम्यान गेल्या वर्षी कोरोनामुळे ही यात्रा रद्द करण्याचा देवस्थान प्रशासनाने निर्णय घेतला होता. त्यामुळं यंदा हजारोंच्या संख्यने कोल्हापूरच्या पट्टण कोडोलीत बिरदेवयात्रा आणि भाकणूक कार्यक्रम पार पडला.

पट्टण कोडोलीतील विठ्ठल बिरदेव यात्रेत धनगरी ढोल, कैताळाचा निनाद, खोबरे आणि लोकरीची उधळण करत प्रारंभ झाला. यात्रेच्या मुख्य सोहळ्यास दुपारी दीडच्या सुमारास सुरुवात झाली. हेडाम सोहळ्यातील मानाच्या तलवारीचे पूजन मानकऱ्यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर धनगर समाज बांधवाबरोबरच पुजारी, गावडे, पंच मानकरी पोलिस पाटील यांनी फरांडेबाबांना मंदिरात येण्यासाठी निमंत्रण दिले. त्यानंतर फरांडेबाबा नानादेव वाघमोडे यांनी हेडाम सोहळ्याचे नृत्त करत घडवले. हेडाम खेळत फंराडेबाबानी देवाचे दर्शन घेतले व विठ्ठल बिरदेवाच्या नावानं चांगभलं असा गजर करीत भाकणूक केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

आर्यन खान प्रकरणातील फरार किरण गोसावी पोलिसांना शरण येणार?

‘सत्यमेव जयते २’चा नवीन ट्रेलर रिलीज