in

पुण्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा; रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचारासाठी लागणारे रेमडेसिवीर इंजेक्शनचा राज्यभर तुटवडा जाणवत असून पुणे शहर आणि जिल्ह्यातही हे इंजेक्शन उपलब्ध होत नाहीये. त्याच्या निषेधार्थ आज सकाळपासून पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर कोरोनाबाधित रुग्णांच्या नातेवाईकांचे ठिय्या आंदोलन सुरू आहे.

कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या पुणे शहर आणि जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळे आरोग्य सेवा कमी पडताना दिसत असून ज्या रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे अशांना रेमडेसिवीर इंजेक्शन देणे आवश्यक आहे. मात्र, हे इंजेक्शन उपलब्ध होत नसल्याने, अनेक नातेवाईकांना इंजेक्शन मिळविण्यासाठी पुणे शहरात अनेक ठिकाणी वणवण फिरावे लागत आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

7th Pay Commission| केंद्र सरकारच्या कर्मचार्‍यांच्या पगारात होणार ‘हा’ मोठा बदल

Delhi Weekend Curfew | दिल्लीत वीकेण्ड कर्फ्यू