in

Vasai-Virar महापालिकेने काढले नवीन आदेश…

Share

वसई-विरारमधील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र प्रतिबंधित क्षेत्र वगळून व आस्थापना मर्यादित ठेवून हे सर्व सुरु करण्याचे आदेश देण्यात आले आहे. दुकाने उघडे करण्याचे तासही वाढवले आहेत . त्यामुळे शहरातील हॉटेल्स, लॉज व दुकानदाराना आता दिलासा मिळणार आहे.

22 मार्चपासून लागू झालेल्या लॉकडाऊनपासून शहरातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊस बंद ठेवण्यात आले होते. त्यांनतर आता राज्य सरकारने मिशन बिगेनची घोषणा केल्यानंतर हळूहळू सर्व क्षेत्र शिथिल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार आता महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी आजपासून शहरातील हॉटेल्स, लॉज आणि गेस्ट हाऊसना सुरु करण्यास परवानगी दिली.

मात्र हॉटेल्स, लॉज सुरु करण्यासाठी काही नियम घालून दिले आहेत. हॉटेल्स मध्ये राहणाऱ्या ग्राहकांना हॉटेल्मध्ये जेवणाची व्यवस्था असेल. तर बाहेरील नागरिकांना हॉटेल्मध्ये जेवणासाठी बसता येणार नाही, त्यांच्यासाठी पार्सलची सुविधा उपलब्ध असणार आहे.तसेच लॉज मध्ये किंवा हॉटेलमध्ये येणाऱ्या ग्राहकांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. पाहुण्यांची तपासणी, थर्मल स्क्रीनिंग करणे, लक्षणे नसलेल्या ग्राहकांनाच प्रवेश, डिजिटल पेमेंट, मास्क वापरणे असे सर्व नियम बंधनकारक असणार आहेत. तसेच कार्यक्रमाचे आयोजन आणि लोकांना एकत्रित येण्यास मनाई असली तरी 15 व्यक्तींच्या मर्यादेत सभागृहाचा वापर करता येणार आहे. जर या नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाई करण्यात येणार आहे.

दुकानदारांना दिलासा

वसई-विरार महापालिका हद्दीतील दुकानं आणि मार्केट याआधी सकाळी 9 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत खुले ठेवण्याचे आदेश होते. परंतु आता दोन तासाचा कालावधी हा वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे व्यापारी आपली दुकानं सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत चालू ठेवू शकतात.दरम्यान दुकानदारानी दुकानात मास्कचा वापर, सोशल डिस्टन्स ठेवणे सक्तीचे आहे. दुकानदार किंवा मार्केटमध्ये नियमांचे उल्लंघन झाल्यास त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार आहे. त्यासोबत दुकानही बंद करणार, असे आदेश वसई विरार महापालिका आयुक्त गंगाथरन डी यांनी दिले आहेत.

कोरोना आकडेवारी

वसई विरार मध्ये बुधवारी 24 तासांत 212 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. या रुग्णवाढीने शहरातील कोरोनाची एकूण रुग्ण संख्या 6811 वर पोहोचली आहे. तसेच काल4 रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे मृत्यूंची संख्या 134 वर पोहोचली आहे. तसेच 307 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे
एकूण बरे झालेलया रुग्णांची संख्या 4007 झाली आहे.तर उर्वरित उपचार घेत असलेले रुग्ण 2670 आहेत.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

MAHAJOBS नोंदणी धारकांसाठी खुशखबर

‘या’ महानगरपालिकेत 1901 जागांसाठी भरती