in

धक्कादायक | महेंद्रसिंग धोनीच्या 5 वर्षांच्या मुलीवर रेप करण्याची धमकी

Share

लॉकडाऊन पूर्वीचा आणि सध्या आयपीएल स्पर्धेत खेळत असलेला महेंद्रसिंग धोनी याच्यात प्रचंड फरक पडलेला दिसून येत आहे. या सीजनमध्ये एम.एस. धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपरकिंग्सला चौथ्यांदा पराभव स्वीकारावा लागला आहे. यामुळे सोशल मीडियावर चाहत्यांनी धोनीवर टीका करण्यास सुरुवात केली. परंतु, काही चाहत्यांनी मात्र टीकेची हद्दच गाठली. एका चाहत्याने चक्क माहीची पाच वर्षीय कन्या झिवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी सोशल मीडियावरून दिली आहे.

चेन्नई सुपरकिंग्सच्या यंदाच्या कामगिरीवर नाराज असलेले चाहते माहीला ट्रोल करतच आहेत. पण त्याची पत्नी साक्षी हिलाही शिव्याशाप दिले जात आहेत. एका धोनी चाहत्याने चक्क माहीची पाच वर्षीय कन्या जीवा हिच्यावर बलात्कार करण्याची धमकी सोशल मिडियावरून दिली आहे. या चाहत्याला आता नेटकऱ्यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.

तसेच, भारताचा माजी वेगवान गोलंदाज इरफान पठाण यानेही ट्विटरवरून माहीबाबत असे वक्तव्य करणाऱ्या चाहत्याला चांगलेच खडसावले आहे. सर्व खेळाडू त्यांच्यातील चांगले ते देण्याचा प्रयत्न करत आहेतच. पण दरवेळी त्याचा उपयोग होतोच असे नाही. पण त्यामुळे छोट्या मुलाला अशा प्रकारची धमकी देण्यात अर्थ नाही, असे पठाण म्हणाला आहे.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

जागतिक मानसिक आरोग्य दिन : लॉकडाऊनमुळे मानसिक आजारांच्या रूग्णांमध्ये वाढ

Viral video : हरिहर गड सर करणाऱ्या ट्रेकर आजी, आशा आंबडेंचा नवा विक्रम