in

पुलवामा हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती, हल्ल्यातील रसायनांची डिलिव्हरी अमॅझॉनकडून

जम्मू काश्मीरच्या पुलवामा प्रकरणात एक नवी माहिती समोर आली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ इंडिया ट्रेडर्स म्हणजेच (CAIT) ने दिग्गज ई कॉमर्स कंपनी अॅमेझॉनवर गंभीर आरोप केला आहे. या हल्ल्यासाठी जी रसायनं दहशतवाद्यांनी वापरली, त्याची डिलिव्हरी अमेझॉन कंपनीकडून करण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे.

२०१९ मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या आत्मघातकी दहशतवादी हल्ल्यामध्ये सीआरपीएफच्या ४० जवानांचा मृत्यू झाला होता. या हल्ल्याचा तपास करत असलेल्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने आपल्या रिपोर्टमध्ये याबाबत माहिती दिली होती. अॅमेझॉनने दहशतवाद्यांनी खरेदी केलेल्या रसायनांची सविस्तर माहिती तपास यंत्रणांना दिली होती. त्यानंतर अ‍ॅमेझॉनच्या मदतीनेच तपास यंत्रणांनी दोन दहशतवाद्यांना अटक केली होती. या दहशतवाद्यांनी अ‍ॅमेझॉनवरून भारतात बंदी असलेले अमोनियम नायट्रेड खरेदी केले होते.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

एसटी संपावर आज तोडगा निघणार?, मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी

अनिल देशमुखांच्या मुलाला दिलासा नाहीच; कोर्टाचा ‘हा’ निर्णय