in

धक्कादायक | चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीची आत्महत्या, राहत्या घरात घेतलं पेटवून

बॉलीवूडमध्ये आत्महत्येचं सत्र सुरूचं असल्याचं समोर येतं आहे. एका चित्रपट निर्मात्याच्या पत्नी आणि मुलीने मुंबईच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आहे. हिंदी चित्रपट निर्माते संतोष गुप्ता यांनी पत्नी अस्मिता आणि मुलगी सृष्टी यांनी स्वतःला पेटवून घेत आत्महत्या केली आहे.

मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता आणि सृष्टी यांनी आपल्या राहत्या घरी म्हणजेच मुंबईमधील अंधेरी येथील डीएन नगर इथे ही आत्महत्या आहे. स्वतःला खोली बंद करून त्यांनी स्वतःला पेटवून घेतलं. खोलीला आग दिसली, धूर झाल्याने शेजाऱ्यांनी अग्निशामक दलाला बोलविलं. त्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला आहे.

अस्मिता गुप्ता या 55 वर्षांच्या होत्या. त्या बऱ्याच दिवसांपासून किडनीच्या दुर्धर आजाराने त्रस्त होत्या. आजाराला कंटाळून त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जातं आहे. आईची ही अवस्था पाहून मुलगी सृष्टीनेसुद्धा आत्महत्या केली असावी, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या दोघींना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र अस्मिता 70 टक्के भाजल्या होत्या आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. निर्माता संतोष गुप्ता यांनी याबाबत अद्याप काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

What do you think?

-4 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात कोरोनाची दुसरी लाट; महापालिका आयुक्तांची धक्कादायक माहिती

सचिन तेंडुलकर कोरोनामुक्त होऊन घरी परतला