in ,

धक्कादायक! गोंदिया जिल्हयात आज कोरोनाचे २० नवे कोरोनाबाधीत

Share

गोंदिया: आज जिल्ह्यात नवीन २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झालीये. १ मे रोजी मुंबईतुन जिल्हयात दाखल झालेल्या दोन व्यक्तींचा अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे जिल्हयात आज २१ मे रोजी अक्टिव्ह कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या २२ इतकी झाली आहे. यापुर्वी  गडचिरोली जिल्हयात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रत्यक्ष संपर्कात आलेल्या आणि गोंदिया जिल्हयात दाखल झालेल्या ६१ नागरिकांना संस्थात्मक अलगीकरण कक्षात दाखल करुन त्यांचे घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील विषाणू चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.

त्यानंतर जिल्हयात १९ मे रोजी २ रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यामुळे लॉकडाऊनच्या कालावधीत मुंबई येथून त्यांच्या सोबत प्रवास करणाऱ्या सर्व नागरिकांचा संपर्क तपासण्यात आले. या दोन पॉझिटिव्ह रुग्णांच्या सोबत प्रवास करणाऱ्या तसेच इतर एकुण ६१ नागरिकांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यापैकी २१ नागरिकांचे चाचणी अहवाल आज २१ मे रोजी सायंकाळी प्राप्त झाले. त्यापैकी २० पॉझिटिव्ह आणि १ नमुन्याचा अहवाल निगेटीव्ह आला आहे.

त्यामुळे या सर्व नागरिकांना कोरोना केयर सेंटर जिल्हा क्रीडा संकुल, गोंदिया येथे भरती करण्यात आले आहे. हे सर्व नागरिक अर्जुनी-मोरगाव आणि सडक-अर्जुनी तालुक्यातील आहेत. २१ मे रोजी ५० नमुने तपासणीसाठी नागपूर येथील पाठविण्यात आले आहे. जिल्ह्यात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आता प्रत्येक व्यक्तीने दक्ष राहण्याची वेळ आली आहे. प्रत्येकाला आता कोरोना योद्धा म्हणून काम करण्याची वेळ आली आहे.

राज्यात आज २ हजार ३४५ कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली त्यामुळे एकूण संख्या आता ४१ हजार ६४२ अशी झाली आहे. आज नवीन १ हजार ४०८ कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. एकूण ११ हजार ७२६ रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. राज्यात एकूण २८ हजार ४५४रुग्णांवर उपचार सुरू असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज सांगितले.

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

Madhav Abhyankar | ‘युद्ध कोरोनाविरुद्ध’ मध्ये अभिनेता माधव अभ्यंकर लोकशाही न्यूजवर…

आजपासून राज्यातल्या ‘या’ भागात लालपरी पुन्हा धावणार, नियमावलीही जाहीर…