in

‘ज्यांना इतिहास घडवता येत नाही ते लोक इतिहास पुसतात’

भारतात इतिहास संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ (ICHR) या संस्थेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात देशाचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरु यांचा फोटो वगळल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

‘राहुल गांधी, प्रियांका, सोनियांशी मोदी सरकार आणि भारतीय जनता पक्षाचे भांडण असू शकेल, पण पंडित नेहरुंशी वैर का? नेहरुंनी निर्माण केलेली राष्ट्रीय संपत्ती विकूनच आज सरकार अर्थचक्राला गती देत आहे. स्वातंत्र्य लढ्यातील नेहरुंचे स्थान अढळ आहे. तो इतिहास पुसणे हे शौर्य नाही’, अशा शब्दांत संजय राऊत यांनी ‘रोखठोक’मधून सरकारवर निशाणा साधला आहे. देशांच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास बदलला जात आहे काय? यावर आता राजकीय वादळ उठले आहे. ज्यांना इतिहास घडवता येत नाही असे लोक इतिहासाचे संदर्भ पुसण्यात धन्यता मानतात, ही जगभराची रीत आहे, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

इतिहासावर संशोधनावर काम करणाऱ्या ‘इंडियन काऊन्सिल ऑफ हिस्टॉरिकल रिसर्च’ या संस्थेनं ‘आजादी का अमृत महोत्सव’च्या पोस्टरवर पंडित नेहरुंचं चित्र वगळले. या पोस्टरवर महात्मा गांधी, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, मदन मोहन मालवीय आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची छायाचित्र ठळकपणे आहेत. पण पंडित जवाहरलाल नेहरू व मौलाना अबुल कलाम आझाद यांना वगळण्यात आले. नेहरु , आझादांना वगळून स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास पूर्ण होऊ शकत नाही, पण नेहरुंना खासकरुन वगळून विद्यमान सरकारने आपल्या कोत्या मनाचे दर्शन घडवले, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

‘ओबीसींचा विषय पुढे करून सरकार काही गोष्टी साध्य करून घेतंय’

ऋषी कपूर यांच्या शेवटच्या चित्रपटाचा फर्स्ट लुक रिलीज