in

पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा डाव; सामना अग्रलेखातून फटकारे

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात अनेक नवीन नेत्यांना संधी देण्यात आले तर काहींना डावलण्यात आले आहे. दरम्यान या विस्तारात मुंडे भगिनी नाराज असल्याच्या चर्चा आहे. यावर अद्याप मुंडे भगिनींची प्रतिक्रिया समोर आली नाही आहे. याच मुद्द्यावर सामना अग्रलेखातून कराडांना मंत्रिपद म्हणजे पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा डाव असल्याचा गंभीर दावा करण्यात आलाय.

भागवत कराड हे राज्यमंत्री झाले. पंकजा मुंडे यांना संपूर्ण खतम करण्याचा हा डाव आहे. कराड हे गोपीनाथ मुंडेंच्या सावलीत वाढले, पण प्रीतम मुंडे यांचा विचार न करता कराड यांना मंत्री केले गेले. वंजारी समाजात फूट पाडण्यासाठी व पंकजा मुंडे यांना धडा शिकविण्यासाठीच हे केले काय, अशी शंका घ्यायला जागा आहे, असं अग्रलेखात म्हटलंय.

राणेंना क्षमतेनुसार खात मिळालं नाही

महाराष्ट्रातून अखेर नारायण राणे यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागली हे बरेच झाले. तेसुद्धा मूळचे भाजपचे नाहीत. शिवसेना, काँग्रेस व आता भाजप असा त्यांचा प्रवास मनोरंजक आहे. राणे यांना अधिक महत्त्वाचे खाते मिळेल असे वाटले होते, पण लघु व मध्यम उद्योग असे एक खाते त्यांना दिले. म्हणजे ते धड उद्योगमंत्रीही नाहीत किंवा व्यापारमंत्री नाहीत. त्यातल्या त्यात समाधानाची बाब म्हणजे, त्यांना नेहमीचे ठरलेले अवजड उद्योग खाते दिले नाही.

राणे यांना लघु व मध्यम उद्योगांची सध्याची स्थिती पाहून पावले टाकावी लागतील. देशातले उद्योग, व्यापार पूर्ण मेटाकुटीस आला आहे. लहान उद्योगांना तर जिवंत राहणे अवघड झाले. अशा वेळी राणे काय करणार ते पाहायला हवे. खरे तर राणे हे जास्त क्षमतेचे गृहस्थ आहेत. त्यांची क्षमता गृह, संरक्षण, अर्थ अशी देशपातळीवरची खाती सांभाळण्याचीच आहे, पण आता त्यांना लघु उद्योगात चमक दाखवावी लागेल.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पावसाअभावी करपू लागलेल्या तीन एकर सोयाबीन पीकावर शेतकऱ्याने फिरवला ट्रक्टर

मुंबईसह ठाण्यात आज लसीकरण बंद, पालिकेची माहिती