in

‘तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर…’; संजय गायकवाडांची भाजपा आमदाराला धमकी

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल गायकवाड यांनी नुकतंच आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. यानंतर बुलडाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आता बुलडाण्यामधील जळगाव जामोदचे भाजपा आमदार संजय कुटेंवर आगपाखड केली आहे. त्यामुळे संजय गायकवाड पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकण्याची चिन्हं आहेत.

संजय गायकवाड यांची जीभ पुन्हा घसरली आहे. ‘ भाजपाचा संजय कुटेसारखा तीनपाट आमदार दिवसभर दारू पिऊन वावरात पडलेला असतो. माझा पुतळा काय जाळतो, हिंमत असेल तर माझ्यासमोर येऊन दाखव. मग मी काय आहे ते दाखवतो, अशी धमकीच संजय गायकवाड यांनी दिली आहे.

संजय गायकवाड यांनी व्हिडिओ जारी करून म्हटलं आहे की, ‘राज्यात शिवसेनेचा मुख्यमंत्री आणि काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचं सरकार आहे म्हणून केंद्राकडून रेमडेसिवीर, ऑक्सिजनचा पुरवठा होत नाही. मी फक्त यातील वस्तुस्थिती मांडली तर माझा पुतळा जाळण्यात आला. पण यात माझा दोष काय? देशातील सर्व लोक एकाच पक्षाचे आहेत का? राज्यात मुख्यमंत्री आपला नाही म्हणून अडवणूक करता. राज्यातील जनतेला मरणाच्या दारात सोडत असाल तर मी जी भावना मांडली ती चुकीची आहे का?’ असा सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला.

भाजपा आमदार संजय कुटेंना धमकी –

संजय कुटेसारखे आमदार दारू पिऊन वावरात पडलेले असतात. त्याला सर्व शौक आहे तो मवाली आहे. तुझ्या मायनं दूध पाजलं असेल तर ५० मीटर माझ्याजवळ येऊन दाखव, तुला संजय गायकवाड काय आहे ते दाखवतो, अशी धमकी शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी भाजपा आमदार संजय कुटे यांना दिली आहे.

फडणवीसांवर केली होती टीका –

संजय गायकवाड यांनी देवेंद्र फडणवीसांवर नुकतीच आक्षेपार्ह शब्दांत टीका केली होती. ‘तुमच्या सरकारमुळे लाखो लोक मरतील त्याचं काय? ज्याच्या घरातला माणूस मरतो, ज्याच्या घरात जीव जातो, त्याला समजतं की कोरोना काय आहे? मला कोरोनाचे जंतू सापडले असते तर मी देवेंद्र फडणवीसांच्या तोंडात कोंबून टाकले असते, असं विधान संजय गायकवाड यांनी केलं होतं.

फडणवीसांचं गायकवाड यांना प्रत्युत्तर –

‘संजय गायकवाड यांनी रात्रीची उतरली नसताना पत्रकार परिषद घेतली असावी. मात्र, मी त्यांना विनंती करतो की, माझ्या घशात कोरोनाचे किटाणू घालण्याआधी त्यांनी हँडग्लोज घालावेत आणि चेहऱ्यावर नीट मास्क लावावा. कारण काय आहे की, मला जनतेचे आशीर्वाद आहेत. त्यामुळे मला काही होणार नाही. मात्र, माझ्या माहितीप्रमाणे सामान्य माणसापेक्षा तळीरामांना कोरोना लवकर होतो, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी लगावला आहे.

What do you think?

-1 points
Upvote Downvote

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Corona | पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार महत्त्वाची बैठक

CORONA | कोरोना वॉरियर्ससाठीची असलेली विमा योजना मोदीं सरकारने केली बंद