in

Shivrajyabhishek | ‘मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय राहणार नाही’ रायगडावरून संभाजीराजेंचा इशारा

मी काही राजकारणी नाही, राजकारण करणार नाही, मराठा समाजाला वेठीस धरणार नाही, धरायचंही नाही, जर काही चुकलं असेल तर दिलगिरी व्यक्त करतो, दिशाभूल करण्याचं रक्त आमच्यात नाही, असं म्हणत खासदार संभाजीराजे यांनी रायगडावरून मराठा समाजाला आश्वासन दिलं. मी मेलो तरी चालेल पण मराठा समाजाला न्याय मिळवून दिल्याशिवाय राहणार नाही, अशी गर्जनाच राजेंनी केली. रायगडावर शिवराज्यभिषेक सोहळा संपन्न झाला. यावेळी खासदार संभाजी छत्रपती यांनी रायगडावरून मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.

‘आत्तापर्यंत तुम्ही माझा संयम पाहिला. हो आहे मी संयमी. पण इथून पुढे तुम्ही माझा संयम पाहणार नाहीत. मी मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल. म्हणून आम्ही ठरवलंय की आंदोलन हे निश्चित आहे’, अशा शब्दांत संभाजीराजे भोसले यांनी सरकारला सुनावले आहे. आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून सरकारला इशारा दिला आहे.

६ जून अर्थात शिवराज्याभिषेक दिनापर्यंत मराठा आरक्षणाविषयी सरकारने ठोस भूमिका घेतली नाही, तर आम्ही भूमिका जाहीर करू, असा इशारा खासदार संभाजीराजे भोसले यांनी दिला होता. त्यामुळे आज शिवराज्याभिषेक सोहळ्यानंतर संभाजीराजे भोसले रायगडावरून काय भूमिका जाहीर करतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. त्यानुसार रायगडावर झालेल्या शिवराज्याभिषेक दिनाच्या कार्यक्रमानंतर संभाजीराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडली आहे. छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षण दिलं होतं. त्यामुळे कोल्हापूरमधून 16 जून रोजी पहिले आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणाही संभाजीराजेंनी केली.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

लसीकरण प्रमाणपत्रावर मोदींएवजी ममता दीदी, पश्चिम बंगाल सरकारचा भाजपला दणका

दोन महिन्यानंतर मोठी कोरोना रूग्णसंख्येत घट