in

पाकिस्तानात फडकणार भगवा

महाराष्ट्रात मोठ्या शिवजयंती साजरी केली. परंतु शिवजयंती फक्त महाराष्ट्रापुरती सीमित न राहता यावर्षी पाकिस्तानाच्या आसमंतात भगवा फडकणार आहे. कराचीत मराठी बांधव दणक्यात शिवजयंती साजरी करणार आहेत. या कार्यक्रमासाठी तेथील शासनाने देखील परवानगी दिली असून, या कार्यक्रमात खासदार उदयनराजे भोसले ऑनलाइन पद्धतीने सहभागी होणार आहेत.

यावेळी महाराष्ट्र दंगलमुक्त अभियानाचे अध्यक्ष व थोर मुस्लिम विचारवंत शेख सुभान अली २१ फेब्रुवारी रोजी सायंकाळी पाच वाजता पाकिस्तानमधील मराठी बांधवांना छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास ऑनलाइन सांगणार आहेत. पाकिस्तानमधील हे मराठी बांधव प्रथमच छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा इतिहास ऐकणार आहेत. पाकिस्तानमध्ये सुमारे 700 मराठी कुटुंबे पिढ्यान्‌ पिढ्या राहात आहेत. हे मराठी बांधव आता कराचीत शिवजयंती साजरी करणार आहेत.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पुण्यात पुन्हा संचारबंदी…नाईट कर्फ्युची कडक अंमलबजावणी

भारत-चीन सीमावाद; लष्करामध्ये १६ तास चर्चा