in

मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचा गुजरातींभोवती रंगला रासगरबा!

लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबई महापालिका निवडणूक शिवसेना आणि भाजपासाठी प्रतिष्ठेची झाली आहे. महापालिका सर करण्यासाठी दोघांनीही कंबर कसली आहे. ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असे सांगत गुजराती बांधवांसाठी खास शिवसेनेनं रविवारी गरब्याचे आयोजन केले होते. मालाडमधील एका हॉटेलमध्ये हा गरबा रंगला. रंगीबेरंगी पेहराव परिधन करत मोठ्या संख्येनं गुजराती बांधव यात सहभागी झाले.

निवडणूक जवळ आली की, सगळ्यानाच मतदारराजाची आठवण होते; मग शिवसेना याला अपवाद कशी असेल. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुजराती मतदारांना आकर्षिक करण्यासाठी शिवसेनेने या कार्यक्रमाचे आयोजन करत मोठे पाऊल उचलले आहे. या कार्यक्रमातील खास आकर्षण म्हणजे 21 गुजराती उद्योगपती आणि व्यायवसायिकांचा शिवसेनेतील प्रवेश! खास सनईच्या स्वरात गुजराती उद्योपतींनी शिवबंधन हाती बांधत शिवसेनेत प्रवेश केला.

गुजराती बांधव खाण्याच्या बाबतीत खास चोखंदळ असतात त्याची पुरेपुर काळजी या रासगरबा कार्यक्रमात घेण्यात आली होती. जिलेबी आणि फाफडा या डिश भोजनाच्या स्टॉलवर दिसत होत्या. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शाह यांच्या नेतृत्वात या समारंभाचे आयोजन करण्यात आलं होते. त्याला गुजराती बांधवांनी चांगला प्रतिसाद दिला. मुंबई महानगरपालिका हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. भाजपाशी का़डीमोड घेतल्यामुळे भाजपाशी दोन हात करण्यासाठी शिवसेनेला मराठी मतांसोबतच गुजराती भाषिकांचीही मते खूप महत्त्वाची आहेत. त्यातच काळासोबत शिवसेनेच्या भूमिकेतही बदल झाला आहे. त्यामुळे हा बदललेला शिवसेनेचा चेहरा मत मिळवण्यात किती यशस्वी ठरतो, हे नजीकच्या भविष्यात दिसेलच.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

…म्हणून हिमकड्याचा भाग कोसळून उत्तराखंडमध्ये झाला हाहाकार!

‘गो कोरोना’ या घोषणेची राहील तुम्हाला साथ…कवी आठवलेंच्या गृहमंत्र्यांना शुभेच्छा!