in

शिवसेनेचं मुंबई मा जलेबी ने फाफडा’नंतर आता ‘रासगरबा’

लोकशाही न्यूज नेटवर्क

‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा.’ नंतर आता शिवसेनेनं गुजराती बांधवांसाठी ‘रासगरबा’ आयोजीत केलय. या कार्यक्रमात २१ उद्योजक आणि व्यावसायिक शिवसेना पक्षात पक्ष प्रवेश करणार आहेत. शिवसेनेचे राष्ट्रीय संघटक हेमराज शहा यांनी गुजराती बांधवांसाठी हा कार्यक्रम आज मालाडमध्ये आयोजीत केला आहे. मुंबई महापालिका निवडणुकीला आता एक वर्षाचा अवधी उरली आहे. त्यामुळे शिवसेनेनं आता भाजपाची व्होटबँक असलेल्या गुजराती बहूल विभागात मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन सुरू करण्यात आलं आहे.

निवडणूक जवळ आली की सर्व राजकीय पक्षांना मतदारांची आठवण होते. मग याला शिवसेनेचा अपवाद कशी अपवाद असेल भाजपाने सहा महिन्यांपूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीचं बिगुल वाजवलं. आता शिवसेनाही तयार झाली आहे. भाजपाची व्होटबँक फोडताना आपली मते वाढवण्यासाठी शिवसेनेने गुजराती मतदारांना आकर्षित करण्याचं मोठं पाऊल उचललं आहे.

10 जानेवारी मुंबईत संघटक हेमराज शाह यांच्या नेतृत्वाखाली गुजराती मेळावा घेण्यात आला. त्यासाठी ‘मुंबई मा जलेबी ने फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असा प्रचार करण्यात आला. या मेळाव्याला मिळालेल्या यशानंतर शिवसेनेने गुजराती मतांसाठी रासगरब्याचा घाट घातलाय. यात 21 गुजराती उद्योगपती शिवसेनेत प्रवेश करणार आहेत.
गुजराती मतांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने 2019 मध्येही प्रयत्न केले होते. आदित्य ठाकरेंसाठी वरळी मतदारसंघात केम छो वरळी. ही प्रचार मोहीम त्यावेळी खूप चर्चेत होती.
आता कुणालाही वाटेल की गुजराती मतासाठी शिवसेना एवढी का आटापिटा करतेय.

2011च्या तुलनेत मुंबईतील गुजराती भाषकांच्या संख्येत आता नक्कीच वाढ झालीय. भाजपाशी घटस्फोट घेतल्यामुळे भाजपाशी दोन हात करण्यासाठी शिवसेनेला मराठी मतांसोबतच गुजराती भाषिकांचीही मते खूप महत्त्वाची आहेत. त्यातच काळासोबत शिवसेनेच्या भूमिकेतही बदल झालाय. त्यामुळे हा बदललेला शिवसेनेचा चेहरा मत मिळवण्यात किती यशस्वी ठरतोय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आज सिंधुदुर्ग दौऱ्यावर

आज केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमन मुंबई दौऱ्यावर