in

मोठी बातमी : भाजपाला धडा शिकवण्यासाठी शिवसेना यूपीच्या राजकीय आखाड्यात

शिवसेनेने उत्तर प्रदेशमधील सर्व ४०३ विधानसभेच्या जागांवर निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केलीय. विशेष म्हणजे शिवसेना ही निवडणूक स्वबळावर लढवणार असून पक्षाने कोणत्याही इतर पक्षासोबत युती केलेली नाही. मात्र भविष्यात युती होण्याचे संकेत पक्षाने दिलेत. यासंदर्भातील एक पत्रकच शिवसेनेचे उत्तर प्रदेशचे प्रभावरी विश्वजीत सिंह यांनी जारी केलं आहे.

उत्तर प्रदेशमधील शिवसेनेचे प्रमुख नेते ठाकूर अनिल सिंह यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका करताना उत्तर प्रदेश सरकारमध्ये कायदा सुव्यवस्था सक्षम नसल्याची परिस्थिती आहे, अशी टीका केलीय. उत्तर प्रदेशमध्ये जंगलराज सुरु असून महिला आणि मुलींवर अत्याचार होत असल्याची टीका ठाकूर यांनी केलीये.

शिवसेना ह्या जागा स्वबळावर लढवणार असल्याचं सांगितलं जात आहे मात्र नंतर शिवसेना कोणासोबत युती करणार का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Andheri east

Weather update | कोयना धरणाचे ६ दरवाजे १ फुटांनी उघडणार