पदवीधर मतदारसंघाची निवडणूक एकत्रित लढवून महाविकास आघाडीने चांगले यश मिळविले. त्यामुळे पुढील निवडणुका एकत्रित लढविल्या जाऊ शकतात, असा सर्वांचा होरा होता. मात्र पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी झाली आहे. शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत समोर पार्थ पवार जरी उभे असले तरी, आपण लढणार असल्याचा निर्धार शैला गोडसे यांनी व्यक्त केला. त्यांनी आज वाजत-गाजत बैलगाडीतून येत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी आणि भाजपा या दोन प्रमुख राजकीय पक्षांनी आपले उमेदवार अद्याप जाहीर केलेले नाहीत. तर शिवसेनेतून बंडखोरी करत गोडसे यांनी अर्ज दाखल केला.
मागील निवडणुकीतही शैला गोडसे यांनी तिकीट मागितले होते. मात्र त्यावेळी त्यांना उमेदवारी देण्यात आली नाही. पक्षाने अद्याप संधी दिली नसल्याने जनता आणि कार्यकर्त्यांच्या इच्छेनुसार आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असलयाचे गोडसे यांनी संगितले. 3 एप्रिलपर्यंत अर्ज परत घेण्याची शेवटची मुदत आहे. गोडसे बंडखोरीवर ठाम राहिल्यास महाविकास आघाडीच्या मतांवर परिणाम होणार, असे चित्र दिसत आहे.
Comments
Loading…