in

देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांची गुप्त भेट

Share

भाजप नेते देवेंद्र फडणवीस आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची गुप्त भेट झाल्याची चर्चा आहे. मुंबईत ‘ग्रँड हयात’मध्ये या दोघांमध्ये सुमारे 2 तास चर्चा झाली, अशी माहिती आहे. या दोघांमध्ये झालेल्या चर्चेची माहिती गुलदस्त्यात आहे पण या भेटीमुळे जोरदार तर्क वितर्क लढवले जात आहेत. या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय भूकंप होणार ही चर्चाही रंगली आहे.

संजय राऊत देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेणार, ही भेट उद्धव ठाकरेंच्या परवानगीनेच झाली, अशी सूत्रांची माहिती आहे. बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट झाली, अशीही चर्चा आहे.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट झाली आहे. संजय राऊत यांनी सामनासाठी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेण्याची इच्छा प्रदर्शित केली होती. त्यावर या मुलाखतीसाठी एकदा भेटण्याचे ठरले होते. ती संपूर्ण मुलाखत अनएडिटेड जावी, अशी देवेंद्र फडणवीस यांची इच्छा असल्याने एकदा भेटून प्रारूप ठरविण्यासाठी ही भेट झाली. बिहार निवडणुकीतून परतल्यानंतर ही मुलाखत देण्याचे देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना सांगितले आहे. या भेटीला कुठलाही राजकीय संदर्भ नाही.

प्रवीण दरेकर – विरोधी पक्षनेता, विधानपरिषद

Written by Team Lokshahi

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

Comments

0 comments

राष्ट्रीय पेन्शन योजनेच्या नियमात बदल

दिल्लीत मोठा राजकिय भूकंप; शिरोमणी अकाली दलाची NDA तून एक्झिट