in

उल्हासनगरमध्ये श्रेयवादाची लढाई, भूमिपूजनावरून शिवसेना-मनसे आमनेसामने

उल्हासनगर महापालिका निवडणूक जवळ येत असतानाच शहरात शिवसेना आणि मनसेत श्रेयवादाची लढाई निर्माण झालीय, प्रभाग क्रमांक १ येथील भुयारी गटार आणि रस्त्याच्या सिमेंट काँक्रिटीकरण रस्त्याच्या भूमिपूजनावरून दोन्ही पक्ष आमनेसामने उभे टाकले आहे.

प्रभाग क्रमांक १ येथील शिवनेरी नगर ते भोसले हॉस्पिटलपर्यंत भुयारी गटारीसाठी महापालिकडून साडे तेरा लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. तसेच येथील संपूर्ण सिमेंट काँक्रिट रस्त्यासाठी ४९ लाखांचा निधीही मंजूर झाला आहे. हा निधी महापालिकेचा जनरल निधीतुन विकास कामे केली जाणार आहे. परंतु आता ह्या विकास कामावरून शिवसेनेचे नगरसेवक दिलीप गायकवाड आणि मनसेचे शहर संघटक मैनुदिन शेख आमनेसामने उभे टाकले आहे.
दोन्ही पक्षाकडून आज ह्या विकास कामाचं भूमिपूजन करण्यात आलंय, मनसेच्या पाठपुराव्याने हे काम होत असल्याचे प्रभागात पोस्टर लावण्यात आले आहे. म्हणून आम्ही भूमिपूजन करत असल्याचे मैनुदिन शेख यांनी सांगितले, तर या प्रभागात शिवसेनेचा नगरसेवक असून त्यांनी लोकांच्या समस्या लक्षात घेऊन हे काम मंजूर करून घेतले आहे, असे शिवसेनेने स्पष्ट केले आहे.

What do you think?

Written by Lokshahi News

Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Loading…

0

पाकिस्तान विरुद्धच्या पराभवामुळे टीम इंडियाच बिघडलं गणित

वर्ध्यात सहा तासानंतर बिबट्याला केलं जेरबंद